शेअर बाजारात चांगली वाढ निफ्टी ५० २२२४८.८५ वर सेन्सेक्स ७३२६७.४८ पातळीवर

विशेषतः आजच्या सत्रात लार्जकॅप व मिडकॅप निर्देशांकात वाढ

    21-Feb-2024
Total Views |

stock market
 
 
मेटल, रिअल्टी समभागात मोठी वाढ
 
मुंबई: बेंचमार्क इक्विटी निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. निफ्टी ५० निर्देशांकात ५१.९ अंशाने (०.२३ %) वाढ होऊन २२२४८.८५ पातळीवर पोहोचला आहे. दुसरीकडे बीएसी सेन्सेक्स २१०.०८ अंशाने वाढत ७३२६७.४८ पातळीवर पोहोचला आहे. बँक निफ्टीत २६२.२० अंशाने वाढत ४७३६२.४० पातळीवर पोहोचला आहे. विशेषतः आजच्या सत्रात लार्जकॅप व मिडकॅप निर्देशांकात वाढ पहायला मिळाली आहे. काल संध्याकाळी चांगल्या निर्देशांकाने निफ्टी सेन्सेक्स वाढल्याचे पहायला मिळाले होते.
 
चीनमध्ये आज पिपल बँक ऑफ चायनाने व्याजदरात कपात केली आहे. तेलाच्या खरेदीतील किंमतीत घट, तसेच रिझर्व्ह बँकेने काल जाहीर केलेले बुलेटिनमध्ये अर्थव्यवस्था सुदृढ झाल्याचे सुतोवाच या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून सकाळच्या सत्रात बाजार सकारात्मक दिसत आहे. आजच्या सत्रात मेटल, रिअल्टी समभागात (शेअर) वर मोठी वाढ पहायला मिळत आहे. निफ्टी ५० मध्ये सर्वाधिक निर्देशांक २२२४९.४० पातळीवर पोहोचला गेल्याने आज मार्केट 'बुल' कायम राहिले आहे.
 
नोव्हेलिस या हिंदाल्को कंपनीच्या मालकीची असलेल्या उपकंपनीने आयपीओसाठी स्टॉक एक्सचेंजमध्ये कागदपत्रे फाईल केली होती. आज या समभागात ५ टक्क्याने भाववाढ झाली. मात्र बीएसी मिडकॅप ३९८५९.१८ पातळीवर पोहोचला असून ११८.९७ अंशाने घसरला आहे. बीएसी बँक निर्देशांक ७६.१७ अंशाने घसरत ५३३६५.२ पातळीवर पोहोचला आहे. विशेषतः बीएसी सेन्सेक्सवरील रिअल्टी निर्देशाक १३५.२७ अंशाने वाढत ७१४१.१२ पातळीवर पोहोचला आहे.
 
निफ्टी रिअल्टी १६.५५ अंशाने वाढत ९०३.५५ पातळीवर व बीएसी बँक निर्देशांक १११.२८ अंशाने कमी होत ५३३३०.०९ पातळीवर पोहोचले आहे. याशिवाय बीएसीवर एफ एम सी जी व मेटल समभाग निर्देशांकात वाढ झाली आहे.
 
एनएससी वर टाटा स्टील, जे एस डब्लू स्टील, हिंदाल्को , आयशर मोटर्स, अदानी एंटरप्राईज हे शेअर्स ( समभाग) तेजीत दिसून पॉवर ग्रीड, बीपीसीएल, इन्फी, एक्सिस बँक, एचसीएलटेक या समभागाचे मूल्य घसरले आहे.बीएसीवर टाटा स्टील, जे एस डब्लू स्टील, हिंदाल्को, आयशर मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल हे समभाग तेजीत होत व डिव्हिसलॅब, कोल इंडिया, एक्सिस बँक,इन्फी, बीपीसीएल या समभागात घसरण झाली आहे.