मुंबई: आशियाई देशातील व्यापारात पुन्हा क्रुड (कच्च्या) तेलाचे भाव वाढली असल्याची प्रसारमाध्यमांनी दिली आहे. रेड सी शिपिंग हल्ला प्रकरणातील वाढती अनिश्चितता व युएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याजदर लवकर कमी होतील ही आशा दुभंगलेल्याने अखेर तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. ब्रेंट क्रुड फ्युचर ३० सेंटने (०.३६ टक्क्याने) वाढत ८२.६४ डॉलर प्रति बॅरेलपर्यंत पोहोचले आहे .
युएस वेस्ट टेक्सास, इंटरमिजिऐट क्रुड फ्युचर (डब्लू टी आय) हा २६ सेटंसने वाढत ७७.३ युएस डॉलरपर्यंत पोहोचला होता. तेलाच्या निर्देशांकात वाढ झाल्याने त्याची झळक आशियाई देशांतील बाजारात पोहोचली आहे.
रशियाने आपली ओपेक (ओरगायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज) ला दिलेल्या आश्वासन पूर्ण करण्यासाठी दिवसाला ५ दशलक्ष बँरेल उत्पादन कमी करण्याचे ठरवले आहे. अमेरिकेन फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपातील विलंब होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात १६ फेब्रुवारीपासून या आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत ४.३ डॉलर प्रति बॅरेलपर्यंत किंमतीत वाढ होऊ शकते.