झिशान सिद्दिकी यांना युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हटवले
21-Feb-2024
Total Views |
मुंबई : बाबा सिद्दिकी यांनी सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने त्यांचे सुपुत्र झिशान यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून दूर केले आहे. त्यांच्या जागी अखिलेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.झिशान सिद्दिकी हे वांद्रे (पूर्व) मतदारसंघाचे आमदार आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झिशान यांच्या कार्यालयात हजेरी लावली होती. त्यामुळे ते सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी काँग्रेसमध्ये राहण्याची भूमिका घेतली आहे.