मुंबई : आदित्य धर निर्मित 'आर्टिकल ३७०' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेत्री यामी गौतम विशेष भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, प्रेक्षकांसाठी चित्रपटाच्या टीमने एक खास ऑफर आणली आहे. 'आर्टिकल ३७०' हा चित्रपट आता प्रेक्षकांना केवळ ९९ रुपयांत पाहता येणार आहे.
दरम्यान, 'आर्टिकल ३७०' हा चित्रपट ९९ रुपयांत पाहता येणार असल्याची खास ऑफर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी असणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी आर्टिकल ३७० हा चित्रपट प्रदर्शित होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० जम्मू-कश्मिरमधून हटवून घोषित केलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.
दरम्यान, 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटानंतर आदित्य धर यामी गौतम सोबत पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहेत. आर्टिकल ३७० या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य जांभळे यांनी केले असून निर्मितीची जबाबदारी आदित्य धर यांनी झेलली आहे. या चित्रपटात यामी सोबत प्रियामणी, वैभव तत्ववादी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी आपल्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.