जया एकादशीनिमित्त सजला विठुरायाचा गाभारा; महापूजा संपन्न

चार लाखाहून अधिक भाविक पंढरीनगरीत दाखल

    20-Feb-2024
Total Views |

Pandharpur Vithoba
(Pandharpur Vithoba Jaya Ekadashi)

पंढरपूर :
जया एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी ४ लाखांहून अधिक भाविक पंढरीनगरीत दाखल झाले होते. मंगळवार, दि. २० फेब्रुवारी रोजी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते पहाटेची नित्यपूजा संपन्न झाली. मंदिरातील गाभाऱ्यात यावेळी फुलांची नेत्रदिपक अशी सजावट करण्यात आली होती.
भाविकांनी गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूरात मोठी गर्दी केली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी पंढरपूर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. सर्वांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शन आणि ऑनलाईन दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचे वाटप भाविकांमध्ये करण्यात आले. संपूर्ण पंढरी हरी नामाच्या जयघोषाने दुमदुमली होती.