कल्याणात भाजपातर्फे शिव जन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा

कल्याणात भाजपातर्फे शिव जन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा

    20-Feb-2024
Total Views |

shivjayanti
 
कल्याण : भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम मंडळातर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला शिव जन्मोत्सव सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
 
 
भाजपा कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहजानंद चौकात सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाईसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाचा आकर्षक देखावा उभारण्यात आला होता. पक्षातील महिला पौदाधिकाऱ्यांनी पारंपरिक वेशभुषा परिधान केली होती. फुलांची सजावट केलेल्या पाळण्यात शिव जन्मोत्सवाचा विधी पार पाडला. महाराजांवरील पोवाडे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सादर करण्यात आले. नागरिकांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली होती . बालकलाकारांनी सादर केलेली नृत्य अणि महिला पदाधिकाऱ्यांनी गायलेली शिव अंगाई गीते या मुळे कार्यक्रमात रंगत आली. महाराजांची महाआरती करण्यात आली.या वेळी कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी आणि भाजपचे विविध पदाधिकारी, महिला मोर्चा च्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.