"राम मंदिर ज्या जागी बांधले तिथे..." काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

    20-Feb-2024
Total Views |
 ayodhya ram mandir
 
बंगळुरु : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या एका मंत्र्यांनी राम मंदिराविषयी वादग्रस्त विधान केले आहे. राम मंदिराच्या उभारणीने गरिबी दूर होईल का? असा प्रश्न कर्नाटकचे कामगार मंत्री संतोष लाड यांनी सोमवारी, दि. १९ फेब्रवारी २०२४ केला. कर्नाटकचे कामगार मंत्री लाड म्हणाले की, “राम मंदिराच्या उभारणीने गरिबी हटणार नाही, ते त्यांच्या राजकीय फायद्यासाठी बांधले गेले आहे.
 
संतोष लाड एवढ्यावरच थांबले नाहीत. लाड यांनी राम मंदिर ज्या जागेवर बांधले आहे, त्याला आपला विरोध असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "राम मंदिराच्या उभारणीला आमचा विरोध नाही. ज्या ठिकाणी ते बांधले गेले आहे ते योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुचविलेल्या जागेचे बांधकाम झाले नाही."
 
संतोष लाड यांनी राम मंदिराविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. भाजपने संतोष लाड यांना राम मंदिराविषयीचा इतिहास वाचण्याचा सल्ला दिला आहे. त्यासोबतच वादग्रस्त विधान करण्यापेक्षा राज्यातील जनतेच्या कामांवर लक्ष देण्याचा सल्ला त्यांना माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे.