पोलिसांची मोठी कारवाई! बॉम्ब बनवण्यासाठी सामग्री पुरवणाऱ्या 'अरबाज'ला अटक

    20-Feb-2024
Total Views |
 arrests rioters
 
डेहराडून : हल्दवानी येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिका आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. पोलिस सातत्याने दंगलखोरांना अटक करत आहेत. हल्दवानी हिंसाचाराच्या वेळी दंगलखोरांना बॉम्ब बनवण्यासाठी पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पेट्रोलही जप्त केले आहे. पेट्रोल बॉम्ब बनवणाऱ्यांनाही पोलिसांनी पकडले आहे.
 
हल्दवानी पोलिसांनी सोमवारी, दि. १९ फेब्रुवारी २०२४ आणखी 10 दंगलखोरांना अटक केल्याचे सांगितले आहे. यासह अटक केलेल्या दंगलखोरांची संख्या ६८ झाली आहे. या दंगलखोरांमध्ये अरबाजचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, ज्याने बॉम्बसाठी पेट्रोल पुरवले होते. त्याच्याकडून ९ लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले आहे.
 
अरबाजने शेहजाद आणि फैजानला पेट्रोल दिले होते. अटक करण्यात आलेल्या दंगलखोर मोहम्मद शुएब याच्याकडून पोलिसांनी लुटलेली दोन काडतुसे जप्त केली आहेत. नैनिताल पोलिसांनी दंगलखोर तस्लीम, वसीम सिद्दीकी उर्फ हप्पा, नाझीम आणि उझैर यांनाही अटक केली आहे. हल्दवानी पोलिसांनी तस्लीम आणि वसीमचा शोध घेण्यासाठी शहरभर पोस्टर लावले होते.
 
हिंसाचार प्रकरणी ३ एफआयआर दाखल करण्यात आले होते. मात्र, सध्या दंगलीचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक आणि त्याचा मुलगा फरार आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्यावर बक्षीस जाहीर करण्याचीही तयारी सुरू आहे. अटक करण्यात आलेले बहुतांश दंगलखोर हे दंगल झालेल्या बनभूलपुरा येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी फरार आरोपींची घरेही ताब्यात घेतली आहेत.
 
उल्लेखनीय आहे की, दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी बेकायदा अतिक्रमण करून बांधलेली मशीद आणि मदरसा पाडण्यासाठी पोलीस आणि महापालिकेचे पथक हल्दवानीतील बानभुलपुरा येथे पोहोचले होते. येथे एका दंगलखोर कट्टरपंथी जमावाने त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात पोलीस जखमी झाले आहेत.