'सिडको' महामंडळात करिअर करण्याची उत्तम संधी; अनुभवाची अट नाही, त्वरित अर्ज करा

    20-Feb-2024
Total Views | 167
CIDCO Recruitment 2024
 

मुंबई :   'शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ(सिडको)' अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. सिडकोकडून नव्या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 'सिडको'मधील रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 'सिडको'अंतर्गत एकूण १०१ रिक्त जागांकरिता होणाऱ्या भरतीसंदर्भातील सविस्तर तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

सहाय्यक अभियंता(स्थापत्य) (१०१ जागा).


शैक्षणिक पात्रता -

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी विषयातील पदवी.


वेतनमान -
४१,८०० - १,३२,३०० रुपये.


वयोमर्यादा -

३८ वर्षे.


परीक्षा शुल्क -

खुल्या प्रवर्गाकरिता १००० रुपये
राखीव प्रवर्गाकरिता ९०० रुपये.


अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि. २० फेब्रुवारी २०२४ असेल.


भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121