मौलवी मोहम्मद तहसीन मदरशातील विद्यार्थिनींवर लैगिक अत्याचार!

    19-Feb-2024
Total Views |
sexual molestation


पाटना : बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात एका मदरशाच्या शिक्षकावर विद्यार्थिनींने विनयभंग आणि महिला सहकारी शिक्षिकेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोहम्मद तहसीन असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तहसीनवर कडक कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी निदर्शने केली. मोहम्मद तहसीन विद्यार्थिनींना मदरशातील एका खोलीत नेऊन मालिश करायला लावत असे. या आरोपांच्या विरोधात मदरशाचा प्रमुख मौलवी मोहम्मद तहसीनला पाठिंबा देत आहे. मात्र, तहसीन आणि मुख्य मौलवी हे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पूर्णियाच्या श्रीखंड प्रखंडचे आहे. रहिकपूरमध्ये मदरसा मिफ्तौल उलूम आहे जिथे मोहम्मद तहसीन सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात. आता या मदरशातील महिला स्वयंपाकी आणि गावातील इतर नागरिकांनी तहसीनवर कारवाईसाठी आवाज उठवला आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की मोहम्मद तहसीनचे मदरशात शिकवणाऱ्या महिला शिक्षकाशी अवैध संबंध आहेत. तहसीनचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावाही केला जात आहे.

तसेच प्रौढ मुलीदेखील मदरशात शिकायला जातात असा आरोपही गावकरी करतात. शिकत असताना सहाय्यक शिक्षक मोहम्मद तहसीन मुलींना मदरशाच्या वरच्या खोलीत घेऊन जातो आणि तिथे त्यांच्याकडून मालिश करून घेतो. याबाबत अनेक ग्रामस्थांनी जिल्हा शिक्षणाधिकारी, मदरसा बोर्ड आणि मदरशाचे प्रमुख मौलवी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तक्रारीत त्यांनी मोहम्मद तहसीनला तत्काळ हटवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.गावातील मरकुब आलम यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, तहसीनच्या विद्यार्थिनींकडून ४-५ वेळा गैरवर्तनाच्या तक्रारी आल्या आहेत. मोहम्मद तहसीनच्या कारवायांमुळे शैक्षणिक वातावरण बिघडत असून परिस्थिती सुधारली नाही तर मुली शिक्षणासाठी येणे बंद करतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

मोहम्मद तहसीनने आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. गावकऱ्यांच्या निषेधाला तो कट म्हणत आहे. मदरशाचे प्रमुख मौलवी मोहम्मद एजाजुल यांनीही केलेले आरोप खरे मानत नाहीत. मात्र, प्राप्त झालेल्या तक्रार पत्राची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रमुख मौलवी यांनी तहसीनची बाजू घेण्याचे कारण त्यांचे नाते आहे.