"उध्दव ठाकरेंच्या ओठावर छत्रपती आणि पोटात औरंगजेब!"

    19-Feb-2024
Total Views | 83

Thackeray


मुंबई :
उध्दव ठाकरेंच्या ओठावर छत्रपती तर पोटात औरंगजेब आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यासोबत सत्ता स्थापन करणाऱ्यांना शिवराय काय कळणार? असा सवाल भाजप नेते डॉ. संजय पांडे यांनी केला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
 
संजय पांडे म्हणाले की, "एकेकाळी उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार होतं. तेव्हा त्यांनी शिवजयंती साजरी करण्यावर प्रतिबंध आणला होता. त्यामुळे उध्दव ठाकरेंच्या ओठावर छत्रपती आणि पोटात औरंगजेब आहे, हे उभ्या देशाला माहिती पडलं होतं. ते औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली. मुंबईतील एका उद्यानाला टिपू सुलतानचं नाव द्या असा आग्रह धरणारे उद्धव ठाकरे आहेत. आज संपुर्ण महाराष्ट्राला आणि देशाला कळलं आहे की, यांचं हिंदुत्व म्हणजे बेगडी हिंदुत्व आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "दुसरीकडे उत्तर प्रदेशातील सरकारने रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुघल म्युझियमचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज असं ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपचं सरकारच चालवते, हे त्यावेळी उभ्या देशाला माहिती झालं," असेही ते म्हणाले आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121