"विधानसभेच्या आधी उद्धव ठाकरे भाजपसोबत येणार!"

    19-Feb-2024
Total Views |

Modi & Thackeray


नवी दिल्ली :
येणाऱ्या विधानसभेच्या आधी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्विकारून मोदीजींना पाठींबा देतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. तसेच काँग्रेस आणि शरद पवारांसोबतच्या आघाडीला ठाकरे लवकरच बाय बाय करतील, असेही ते म्हणाले आहेत. सोमवारी नवी दिल्ली येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
रवी राणा म्हणाले की, "मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे आणि अजितदादा भाजपसोबत आलेत. सत्तेवर बसल्यानंतर अहंकारी उद्धव ठाकरे बेचैन झाले आहेत. कधी एकदा मोदीजींचे दर्शन घेतो आणि कधी त्यांची माफी मागतो अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे. त्यामुळे ते काही लोकांच्या माध्यमातून भाजपमध्ये आणि पंतप्रधान मोदींशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या आधी ते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्विकारून मोदीजींना पाठींबा देतील, असे मला वाटते. तसेच काँग्रेस आणि शरद पवारांसोबतच्या आघाडीला ते लवकरच बाय बाय करतील आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात भाजपसोबत येऊन मोदीजींना समर्थन करतील," असा दावा त्यांनी केला आहे.
 
"उद्धव ठाकरेंना आपल्या अहंकारामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला होता. मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात त्यांचं चिंतन सुरु आहे. रश्मी वहिनी, आदित्य ठाकरे हे आपण किती चुकलो याबाबतचं चिंतन करत आहेत. या चिंतनाचा एकच सार आहे की, आता मोदीजींशिवाय त्यांना पर्याय नाही," असेही ते म्हणाले आहेत.