मुंबई : 'दम लगा के हैशा' या २०१५ साली आलेल्या हिंदी चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने केली. पुढे विविधांगी भूमिका चित्रपट. वेब सीरीजमधून साकारत तिने तिचा चाहतावर्ग तयार केला. तिचा भक्षक हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर वर गाजत आहे. ज्यात तिने एका सक्षम पत्रकाराचे प्रतिनिधीत्व अतिशय उत्तम केले आहे. भक्षक या तिच्या वेब सीरीजमधील तिच्या भूमिकेचे कौतुक देशभरातच नाही तर अगदी जागतिक पातळीवरही केले जात आहे.
भक्षक या चित्रपटाने जगभरातील टॉप ५ चित्रपटांच्या यादीत नाव मिळवले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपटात काम करण्याची संधी देखील भूमीकडे आल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूमीला देखील हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे. आशयघन संहिता मिळाल्यास लवकरच भूमी हॉलिवूडपटात देखील झळकण्याची चिन्हे दिसत आहेत. भूमीने आत्तापर्यंत 'टॉयलेट: एक प्रेम कथा','बधाई हो', 'द लेडी किलर','रक्षाबंधन', 'बाला', अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे.