नवी दिल्ली : मुझफ्फरनगरमध्ये टाइम बॉटल बॉम्ब बनवणाऱ्या जावेदच्या अटकेनंतर पोलिसांनी एसटीएफच्या साहाय्याने मुख्य सूत्रधार इमराना हिला अटक केली आहे. दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी पोलीसांनी तिला तिच्या घरातून अटक केली. आता तिची चौकशी सुरु आहे. एसटीएफनंतर दिल्लीची आयबी टीमही इमरानाची चौकशी करत आहे.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात असे उघड झाले आहे की, इमराना १५ वर्षांपूर्वीपर्यंत भट्टीवर मजूर म्हणून काम करत होती, आज तिच्याकडे अनेक घरे आणि प्लॉट आहेत. याशिवाय ती महागड्या कारमधूनही प्रवास करते.
एकीकडे तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले याचा शोध पोलीस घेत आहेत. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा सीएए लागू करण्याची घोषणा केली जाईल, तेव्हा तो बॉम्ब वापरता यावा यासाठी त्यांनी बॉम्ब बनवले असल्याचे समोर आले आहे. इमरानाने दिल्लीतील कोणाच्या तरी सांगण्यावरून असा आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्ती कोण आहे याबद्दल अधिक माहिती मिळेल.इमरानाच्या अटकेनंतर उत्तर प्रदेश पोलीसांचे एसटीएफ आता तिच्या नेटवर्कची माहिती गोळा करत आहे. इमरानामागे कोणत्या संघटना आहेत आणि त्यांचा हेतू काय आहे, याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय इमराना आणि जावेद एकमेकांच्या संपर्कात कसे आले,ह्याचा ही तपास सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले की, इमराना २००९ पासून जावेदचे वडील हकीम झरीफ अहमद यांच्याकडून उपचार घेत होती. त्यावेळी इमरानाने जावेदकडून २ बॉम्ब तयार करून घेतले. यातील एका बॉम्बचा स्फोट तर दुसरा काली नदीत फेकण्यात आला. यावेळीही त्याने १० हजार रुपये देऊन बॉम्ब तयार करण्यास सांगितले आणि नंतर ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले.इमरानाला पकडण्यापूर्वी २०१३ मध्ये मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीदरम्यान तिने सुमारे २०० बॉम्ब बनवण्याचे आदेश दिले होते. दंगलीच्या वेळी तिने हे बॉम्ब वाटले होते. त्या दंगलीत मुझफ्फरनगर आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. तसेच, काही रिपोर्टनुसार बॉम्बची संख्या १०० पेक्षा जास्त आहे आणि काही अहवाल आता ५० हून अधिक बॉम्ब बनवल्याचे सांगत आहेत.
लोक तिला इमराना बाबा या नावानेही ओळखत कारण ती काळी जादू वगैरे करत असे. जावेदच्या अटकेपासून एसटीएफ आणि पोलीस इमरानाचा शोध घेत होते. ती शामली जिल्ह्यातील रहिवासी आहे, परंतु मुझफ्फरनगरमधील मुस्लिमबहुल खालापार भागात राहत होती, अशी माहिती मिळाली आहे. जावेदला अटक केल्यानंतर तपास यंत्रणेने तिच्या घरावर छापा टाकला तेव्हा ती आधीच फरार झाली होती.आता इमरानाची मुलगी रुक्सार हिने सांगितले की, तिने तिच्या आईला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. इमरानाची कसून चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतरच काही सांगता येईल. जावेदने इमरानाच्या सांगण्यावरून टाईम बॉटल बॉम्ब तयार केला होता. हे बॉम्ब बनवण्यासाठी त्याने गन पावडर-९९९, लहान लोखंडी गोळ्या, कापूस, पीओपी इत्यादींचा वापर केला. त्याने डॉक्टरांकडून ग्लुकोजच्या बाटल्या, सायकलच्या दुकानातून लोखंडी गोळ्या आणि घड्याळाच्या दुकानातून घड्याळाची मशीन घेतली होती.