'दंगल गर्ल' सुहानी भटनागरचे निधन; औषधांचा दुष्परिणाम बेतला जीवावर

    17-Feb-2024
Total Views |
dangal-girl-suhani-bhatnagar-passed-away
 
नवी दिल्ली : 'दंगल' चित्रपटातून देशभरात नावारुपाला आलेली 'दंगल गर्ल' सुहानी भटनागर हिचे अवघ्या १९व्या वर्षी निधन झाले. सुहानी हिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे तिच्यावर औषधोपचार सुरू होते. या औषधाचा दुष्परिणाम झाल्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुहानी भटनागरला औषधोपचारादरम्यान दुष्परिणाम झाल्यामुळे तिच्या शरीरात पू होऊ लागला. त्यामुळे तिला दुखापतीतून बाहेर पडण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी, उपचार करूनही ती बरी होऊ शकली नाही.


अभिनेता आमीर खान अभिनयित बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट 'दंगल'मध्ये छोटी बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिने वटवली होती. या चित्रपटामुळेच तिला 'दंगल गर्ल' म्हणून खरी ओळख मिळाली. परंतु, तिच्या आकस्मिक निधनामुळे बॉलीवूड विश्वाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपासून आजारी असल्याचे बोलले जात होते. तसेच, सुहानीवर एम्समध्ये उपचार सुरू होते. अनेक प्रयत्न करूनही डॉक्टर सुहानीला वाचवू शकले नाहीत.