भारतात लक्झरी घरांना मागणी वाढली, मुंबईत ४%, पुण्यात ६४ टक्क्याने मागणीत वाढ
मुंबईत ४ टक्क्याने लक्झरी घरांच्या प्रवर्गात वाढ
मुंबई: सीबीआरई साऊथ एशिया रिपोर्टनुसार भारतात एकूण महागड्या ( लक्झरी) घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील आर्थिक वर्ष २ टक्क्यांच्या तुलनेत तब्बल दुप्पटीने म्हणजेच ४ टक्क्याने महाग घराची मागणी वाढली आहे. आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ( वर्षांनुवर्षे) आधारावर ही मागणी ७५ टक्क्याने घरांची विक्री वाढली असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. यांमध्ये मुंबईत ४ टक्क्याने विलासी घरात वाढ झाल्याचे या अहवालात दर्शविले आहे. सर्वात जास्त मागणी दिल्ली शहरात (१४४ टक्क्याने) वाढली असून त्याखालोखाल पुणे (६४%), हैद्राबाद (२४ %), मुंबई ( ४ %) इतकी मागणी वाढली आहे.
गेल्या दोन तीन वर्षांत मुंबईसारख्या शहरात विशेषतः दक्षिण मुंबईत महागड्या घरांच्या खरेदीसाठी ग्राहक उपलब्ध नव्हते. परंतु रिपोर्टनुसार मात्र मुंबईतील घरांची लक्झरी मागणी वाढली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात ८६००० हून अधिक घरांची विक्री या शहरांत नोंदवण्यात आली आहे. या तीन महिन्यांत प्रिमियम,लक्झरी घरांमध्ये १०% व ४% वाढ पहायला मिळाली आहे.
तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकीसाठी पोषक परिस्थितीने रियल इस्टेटमधील गुंतवणूक वाढत आहे. साध्या, मध्यम प्रकारच्या घरांव्यतिरिक्त मध्यम लक्झरी व प्रिमियम प्रवर्गात देखील ही वाढ दिसून आली आहे. स्थिर विकास हे गुंतवणूकीसाठी वाढलेले प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचा कयास आहे.