शेतकरी आंदोलनामुळे ५०० कोटींचे नुकसान - संजीव अग्रवाल
अग्रवाल यांच्यामते 'एमएसएमई' प्रकारच्या व्यवसायांचे सर्वाधिक नुकसान
मुंबई: पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने, शेतकरी आंदोलनाने उद्योग, व्यापाराचे दररोज ५०० कोटी रूपये नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. संस्थेचे अध्यक्ष संजीव अग्रवाल यांनी उत्तर भारतात देशव्यापी शेतकरी आंदोलनाने व्यापार व रोजगाराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. हे नुकसान प्रति दिवशी ५०० कोटींच्या घरात असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे.
पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने, देशाचे हिताची जपणूक करण्यासाठी तोडगा काढण्यासाठी सरकारला पाचारण केले आहे. अग्रवाल म्हणाले, 'पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान पट्ट्यातील या शेतकरी आंदोलनाने व्यापाराचे मोडे नुकसान झाले आहे. विशेषतः सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एमएसएमई) प्रकारच्या व्यवसायांचे नुकसान झाले आहे. विविध राज्यांतील कच्च्या मालाचे आयाती निर्यात करून ग्राहकांची गरज एमएसएमई व्यवसाय करतात. पंजाब,हरियाणा, दिल्लीत अधिक नुकसान झाले आहे.पंजाब,हरियाणा, दिल्लीतील एकत्रितपणे जीडीपी २७ लाख करोड आहे. त्यामध्ये ३४ लाख सूक्ष्म मध्यम लघू उद्योग या तीन राज्यात असून सुमारे ७० लाख कामगार या क्षेत्रात काम करतात.'
अग्रवाल यांच्यामते फुड प्रोसेसिंग, कॉटन टेक्साटाईल, गारमेंट, ऑटोमोबाईल, फार्म, मशिनरी, पर्यटन, ट्रेडिंग, वाहतूक अशा विविध क्षेत्रातील कामकाजावर या शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे.