शेतकरी आंदोलनाचा व्हिडीओ हरियाणा पोलिसांकडून जारी; 'दगडफेक' करणारे तुम्ही पाहिले आहेत का?

    16-Feb-2024
Total Views |
haryana-police-publishes-video-of-stone-pelters-in-farmers-protest
 
नवी दिल्ली :  हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता हरियाणा पोलिसांकडून या दगडफेकीसंदर्भात एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून स्वत:ला 'अन्नदाता' म्हणवणारे चक्क तोंड लपवून 'दगडफेक' करताना दिसून येत आहे. हरियाणा पोलिसांनी शंभू बॉर्डरचा व्हिडिओ जारी केला आहे.
 

दरम्यान, हरियाणा पोलिसांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये एका बाजूला सुरक्षा दल तैनात आहे आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात आंदोलक दगडफेक करत असल्याचे दिसत आहे. चेहऱ्यावर कापड बांधलेले दगडफेक सुरक्षा दलांवर दगडफेक करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच, आंदोलक शेतकरी हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर सुरक्षा दलांवर दगडफेक करत असल्याचे दिसत आहे.


त्याचबरोबर, अंबाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक पूजा दाबला म्हणाल्या, “आम्ही दगडफेक करणाऱ्यांचा व्हिडिओ जारी केला आहे. त्यांच्या कामगिरीची आम्ही तयारी केली होती. आम्ही बॅरिकेड्स लावले होते आणि निमलष्करी दलही तैनात केले होते. २०२० मध्येही असाच हिंसाचार झाला होता. आमच्याकडे असे व्हिडिओ आढळले आहेत ज्यात लोक बसलेले आहेत, दगड फोडत आहेत आणि सैनिकांवर दगडफेक करत आहेत.”