'पर्यावरण सेवा योजनें'तर्गत 'गोखले एज्युकेशन सोसायटी'मध्ये महापालिकेच्यावतीने व्याख्यान

    16-Feb-2024
Total Views | 30
Panvel Municipal Corporation Promotes Environmental Awareness

पनवेल : 
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याचे महत्व शालेय ,स्तरावर बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये "पर्यावरण सेवा योजना" पनवेल महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ फेब्रुवारी गोखले एकज्युकेशन सोसायटी हायस्कूल खारघर येथे महापालिकेच्यावतीने ‘आकाश’ या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरणाचे महत्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे यासाठी "पर्यावरण सेवा योजना" महापालिकेच्यावतीने पालिका कार्यक्षेत्रातील २५ माध्यमिक विद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी नुकतीच या २५ माध्यमिक शाळांच्या प्रतिनिधींची बैठक उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात घेण्यात आली होती. या पर्यावरण सेवा योजनांतर्गत आकाश, जल, वायू, भूमी, अग्नि या माझी वसुंधरा अभियानातील महत्वाच्या घटकांनूसार कृती कार्यक्रम, शिबिरे,व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, प्रश्नमंजूषांचे आयोजन विद्यालयांमध्ये करण्यात येत आहेत.

पर्यावरण सेवा योजनेंतर्गत आज गोखले एकज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये या योजनेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. माझी वसुंधरा अंतर्गत ‘आकाश’ या विषयांतर्गत पर्यावरणीय सुधारणा यावरती व्याख्यान देण्यात आले.यामध्ये विद्यार्थ्यांनी झाडे दत्तक घेऊन त्यांना वाढविण्याविषयी सांगण्यात आले. याबरोबरच पर्यावरण संवर्धनावर आधारित व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक एन एम.पाटील ,पर्यावरण सेवा योजना कार्यक्रम समन्वयक गौरी शिंदे, इयत्ता सहावी ते आठवीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच पध्दतीने महापालिकेच्यावतीने विविध शाळांमध्ये कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121