अदानींकडून गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प
गुजरात येथील खावडा येथे ५५१ एमडब्ल्यू क्षमतेचा हा रिन्यूएबल ऊर्जा प्रकल्प असणार आहे
मुंबई: अदानी ग्रीन एनर्जीने जगातील सर्वात मोठा रिन्यूएबल ऊर्जा उत्पादन एनर्जी पार्क उभारण्याचे जाहीर केले आहे. गुजरात येथील खावडा येथे ५५१ एमडब्ल्यू क्षमतेचा हा प्रकल्प असणार आहे. या ऊर्जा प्रकल्पाचे तब्बल ३० गिगावॉट ऊर्जा तयार करण्याचा संकल्प असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. ५ वर्षांनी काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प असणार आहे. १६.१ दशलक्ष घरांसाठी आवश्यक ती ऊर्जेची मागणी यातून तयार होत असल्याची माहिती कंपनीने प्रसारमाध्यमांना दिली आहे.
सध्या या प्रकल्पासाठी अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीकडून बांधकाम पुर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे सर्व्हेक्षण झाल्यापासून १२ महिन्यात प्रकल्पासाठी लागणारे रोड, सर्व मूलभूत सुविधा, व याबद्दलच्या आवश्यक इकोसिस्टीमचे अद्यावत काम पूर्ण करण्यात आले आहे. कंपनीने सोलार व वाईंड या प्रामुख्याने नैसर्गिक ऊर्जेच्या माध्यमातून गिगास्केलवर कामकाज सुरू ठेवले होते. कंपनीच्या माहितीनुसार यामध्ये ८१ अब्ज इलेक्ट्रिसिटी व १५२०० हून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
याबाबत प्रतिक्रिया नोंदवताना अदानी ग्रुप कंपनीचे संचालक गौतम अदानी म्हणाले, ' अदानी ग्रीन एनर्जी जगातील सोलार व वाईंडसाठी जगातील सर्वात मोठी रिन्यूएबल एनर्जी इकोसिस्टीमचे अनावरण करत आहे. जगातील सर्वोत्तम दर्जाच्या गुजरात येथील खावडा प्रकल्पासहित कंपनी रिन्यूएबल एनर्जीसाठी अविरत प्रयत्न चालू ठेवणार आहे.'