'प्रचंड राग आलाय, हे सहन करण्यापलिकडे'; कलाकारांची ठाण्यातील 'त्या' घटनेमुळे मुख्यमंत्र्यांकडे धाव

    14-Feb-2024
Total Views |

eknath shinde 
 
मुंबई : सोशल मिडियाच्या काळात व्यक्त होणं फार सोप्पं झालं आहे. आपल्याला न पटलेली किंवा पटलेली कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सोशल मिडियाच्या माध्यमातून नक्कीच केले जाते. अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत सर्वच जण आपली मते ठामपणे मांडत असतात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ठाण्यात मुक्या प्राण्यांचं ग्रूमिंग सेशन करणाऱ्या एका नामांकित सेंटरमधील हा व्हिडिओ आहे, ज्यात एक माणूस एका श्वानाला मारहाण करत आहे. स्पा सेंटरमध्ये तो श्वान गेला असता तिथे त्याच्यासोबत मारहाण झाल्याचे यात दिसत आहे. यावर रितेश देशमुख, मलायका अरोरा, जुई गडकरी यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदतीची साद घातली आहे.
 
काय म्हणाला रितेश देशमुख?
 
रितेशने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, 'ताबडतोब या गुन्हेगाराला अटक करा आणि याला तुरुंगात टाका! हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.'
 

ritesh  
 
काय म्हणाली जुई गडकरी?
 
जुई म्हणाली की, ''एका स्पा सेंटरमध्ये श्वानाला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूप अस्वस्थ करणारा आहे. मी तो व्हिडिओ पूर्ण पाहू देखील शकले नाही. मारहाण करणाऱ्या त्या मनोरुग्णाला देव चांगलीच शिक्षा करो. ज्या हाताने त्याने मुक्या जीवाला मारहाण केली ते हात काही दिवसांनी कामच करणार नाहीत.... कृपया हा अत्याचार थांबवा आणि त्या कर्मचाऱ्याला अटक करून कठोर शिक्षा द्या. तो श्वान सुरक्षित असू देत.... कृपया तुमच्या प्राण्यांना अशा क्लिनिक किंवा स्पा सेंटरमध्ये एकटं पाठवू नका.''
 

jui  
 
काय म्हणाली मलायका?
 
अभिनेत्री मलायकाने श्वानाला मारहाण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार अतिशय संतापजनक असल्याचे तिने म्हटले. या केंद्रावरही कारवाई झाली पाहिजे असेही तिने म्हटले.
 

malayaka  
 
पोलिसांनी केली कारवाई
 
प्राणी प्रेमींनी संताप व्यक्त केल्यानंतर आणि घडल्या प्रकाराची तक्रार नोंदवल्यानंतर ठाणे पोलिसांनी या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच, सदर घटना ज्या ठिकाणी घडली, त्या पेट क्लिनिकने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले असून आमच्यासाठी देखील हा प्रकार धक्कादायक असल्याचे क्लिनिकच्यावतीने सांगण्यात आले आहे.