मुंबई : बसमार्ग क्र. ए -४४१ आणि ए -४४२ च्या बसगाड्या शिवनेरी वसाहत मार्गावर मुंबई महानगरपलिकेतर्फे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे बुधवार , दि. १४ फेब्रुवारीपासून या मर्गिकेतील अप दिशेने मजास आगार आणि सदभक्तिकडे जाणाऱ्या बसगाड्या कै. शंकरराव महाडिक मार्गाने पीएमजीपी ते नमस्कार बसथांब्यादरम्यान वळवण्यात आल्या असून डाऊन दिशेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.
सदर परावर्तनामुळे पुनमनगर (अप दिशा) हा बसथांबा तात्पुरता रद्द केला आहे तर, पीएमजीपी बस थांबा डाऊन दिशेकडे सुमारे १०० मीटर पुढे आणि अप दिशेला सुमारे १०० मीटर मागे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला आहे. सदर काम मे २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे.