आमदार महेश शिंदे यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा

    13-Feb-2024
Total Views |
MLA Mahesh Shinde News


मुंबई
: महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.यासंदर्भात आमदार शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असणारे जलसंधारणाचे काम केले जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला न्याय देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.