"अयोध्येप्रमाणे लवकरच मथुरेतही श्रीकृष्ण विराजमान होतील!"

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

    11-Feb-2024
Total Views | 122

Fadanvis


पुणे :
अयोध्येप्रमाणे लवकरच मथुरेतही श्रीकृष्ण विराजमान होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी पुणे येथे रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सगळ्या गोष्टी कायदेशीररित्या होत आहेत, असेही ते म्हणाले आहेत.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मथुरा, काशी, अयोध्या ही सगळी ठिकाणं आपल्यासाठी खूप पवित्र आहे. ज्याप्रमाणे राम जन्मभुमी निर्माण झाली त्याचप्रमाणे स्वाभाविकपणे लोकांची अपेक्षा आहे की, श्रीकृष्णभुमीचाही विकास व्हावा. ज्याप्रमाणे कायदेशीररित्या मोदीजींच्या माध्यमातून राम मंदिर उभारले गेले, त्याचप्रमाणे कायदेशीररित्या श्रीकृष्णदेखील विराजमान होतील, असा माझा विश्वास आहे."
 
"तसेच काशी विश्वनाथमध्ये आज नवीन कॉरिडर तर बनलाच, याशिवाय तिथे पुजेसाठी परवानगीसुद्धा मिळाली आहे. त्यामुळे देशात एक चांगले वातावरण पाहायला मिळत आहे. सौहार्दपुर्ण वातावरणात आणि कायदेशीररित्या या सगळ्या गोष्टी होत आहेत," असे ते म्हणाले.
 
पुण्याच्या पोलिसांनी काढलेल्या गुंडांच्या परेडवर संजय राऊतांनी टीका केली होती. याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, "कोण संजय राऊत? कोण आहेत ते? कुणी फार मोठे नेते आहेत का? योग्य नेते असतील तर त्यांच्याबद्दल मला विचारायचं. संजय राऊतांबद्दल काय विचारता?" असा टोलाही त्यांनी लगावला.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121