PM किसान योजनेद्वारे ११.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा!
अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची माहिती
01-Feb-2024
Total Views |
नवी दिल्ली : केंद्र सरकारची महत्ताकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनाचा ११.८ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी दिली. दि. १ फेब्रुवारी २०२४ बुधवारी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारने आखलेल्या योजनांची माहिती दिली.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेबरोबरच, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा देखील ४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. अशी माहिती निर्मला सितारमन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात दिली. आपल्या छोटेखानी अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सितारमन यांनी पुढील चार महिन्यांसाठी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन आपल्या कारकीर्दीतील सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. हा अर्थसंकल्प फक्त चार महिन्यासांठी असेल. लोकसभा निवडणूकीनंतर नव्याने सत्ता स्थापन करणारे सरकार या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करेल. हा अर्थसंकल्प जुलै महिन्यात सादर केला जाईल.