काय आहे 'लखपती दीदी' योजना : ज्याचा फायदा ३ कोटी महिलांना होणार?

    01-Feb-2024
Total Views |
Lakhpati Didi Scheme

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दि. १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात ते म्हणाले की, देशातील १ कोटी महिला लखपती दीदी बनणार आहेत. त्यांचा सत्कार केला जाईल. यापूर्वी आमचे लक्ष्य २ कोटी 'लखपती दीदी' बनवण्याचे होते, मात्र आता ते ३ कोटी करण्यात आले आहे.

काय आहे लखपती दीदी योजना?

लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून खेड्यापाड्यात तीन कोटी ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. ही योजना दारिद्र्य निर्मूलन आणि आर्थिक सक्षमीकरणाचे सर्वसमावेशक मिशन म्हणून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून त्यांना वर्षाला एक लाख रुपयांहून अधिक कमाई करता येईल.

सुमारे १५,००० महिला बचत गटांना ड्रोनचे ऑपरेशन आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे उत्पन्नवाढीचे नवे मार्ग तर निर्माण होतीलच शिवाय महिलांना अत्याधुनिक कौशल्येही सुसज्ज होतील. ड्रोनमध्ये अचूक शेती, पीक निरीक्षण आणि कीटक नियंत्रण सक्षम करून शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. या योजनेअंतर्गत महिलांना एलईडी बल्ब बनवणे, प्लंबिंग आणि इतर कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.