बांगलादेशातील ५९ टक्के हिंसाचार प्रार्थनास्थळांच्या मुद्द्यावरूनच
08-Dec-2024
Total Views |
मुंबई : बांगलादेशात सत्तांतर होऊन मोहम्मद युनूस यांचे सरकार आल्यापासून येथील इस्लामिक ( Islam ) कट्टरपंथींकडून हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हिंदूंची मंदिरे, देव-देवतांच्या प्रतिमा यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न या जिहाद्यांकडून वारंवार होत आहे. इस्लाममध्ये मूर्तिपूजकांना ‘काफीर’ मानले जाते. त्यासंबंधी सर्व गोष्टी त्यांच्यासाठी ‘हराम’ आहेत. बांगलादेशात धार्मिक तेढ निर्माण करून हिंदूंची प्रतीके असलेल्या मंदिरांवर याच उद्देशाने हल्ले झाल्याच्या घटना गेल्या काही काळात घडल्या आहेत.
या हल्ल्यांमध्ये मूर्तींची नासधूस करणे, मंदिराच्या संरचनेची तोडफोड करणे आणि उपासना समारंभात व्यत्यय आणणे, अल्पसंख्याक समुदायांमध्ये भीती निर्माण करणे आणि त्यांच्या धार्मिक प्रथा कमी करणे यांचा समावेश आहे. अजरहाट कुरीग्राममधील दुर्गापूजा मंडपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोहम्मद नुरझ्झमन नावाच्या तरुणाला अन्सार सदस्यांनी अटक केली. ढाक्याच्या तातीबाजारमध्ये बॉम्बस्फोट झाला, तेव्हा दरोडेखोरांनी पेट्रोल बॉम्बसदृश बाटली फेकली, परंतु ती फुटली नाही. त्यामुळे अधिकार्यांनी या घटनेला कमी लेखले आणि केवळ दरोड्याचा गुन्हा नोंदवला. ज्यामुळे अल्पसंख्याक धार्मिक स्थळांच्या संरक्षणात कायद्याच्या अंमलबजावणीच्या गांभीर्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते.
किशोरगंजमध्ये, गोपीनाथ जिउर आखाडा दुर्गापूजा मंडपातील मूर्तींची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले होते. त्याचप्रमाणे, नेत्रकोणाच्या ’मैमनसिंग’ आणि ’केंदुआ पाझिला’ येथे घटनांची नोंद झाली आहे, जिथे गौरीपूर नगरपालिकेत एका १७ वर्षीय मुलाला एका मूर्तीची विटंबना केल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. केंदुआ उपजिल्हामधील मातृसंघ दुर्गा मंदिरातील दोन मूर्तींवर हल्ला करण्यात आला. पार्वतीपूर, इनाजपूरमध्ये, देवी कालीला समर्पित असलेल्या एका मंदिरासह पाच मंदिरांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली होती.
दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये, कुआकाटा, पटुआखली येथील अधा-गोविंदा मंदिर आणि पीरगंज पाझिला येथील स्मशानभूमीची तोडफोड करण्यात आली आणि नंतर आग लावण्यात आली. शरियतपूर सदरमधील धनुका मंदिराचीही इस्लामिक धर्मांधांनी विटंबना केली आणि जवळपासच्या अल्पसंख्याक वस्त्या लुटल्या. नेत्रकोणात अमाकृष्ण मिशन आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांसारख्या संस्थांवर झालेल्या हल्ल्यांसह परिसरातील हिंदूंच्या घरांचे मोठे नुकसान झाले.
या हल्ल्यांची तीव्रता हिंदू अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न दर्शवते. मूर्तींवरील हल्ल्यांपासून ते धार्मिक वस्तूंच्या चोरीपर्यंतच्या घटना, राज्याच्या संरक्षणात्मक यंत्रणा अपुरी किंवा उदासीन असल्याचे दिसून येते. यावरून अल्पसंख्याकांसाठी कायदेशीर संरक्षणाची अधिक अंमलबजावणी करण्याची गरज अत्यंत आवश्यक आहे.
‘बांगलादेशी बॉर्डर गार्डिंग फोर्स’च्या जवानांनी आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात भारत-बांगलादेश सीमेवर एका हिंदू मंदिराचे जीर्णोद्धार थांबवल्याच्या घटनेने मोठा वाद निर्माण झाला. नमाजानंतर मशिदीतून मंदिर पाहणे ’हराम’ असून ते धर्मविरोधी असल्याचा युक्तिवाद बांगलादेशी जवानांनी केला. त्यासोबतच बांगलादेशी मुस्लिमांना ते अपमानित करून तेथे हिंसाचाराला उत्तेजन देऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. यावर ‘बीएसएफ’च्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असून सध्या परिस्थिती शांत आहे.
बांगलादेशात याठिकाणी मंदिरे आणि देवदेवतांची विटंबना
बोगुरा जिल्हा : भबानीपूर येथील शक्तिपीठ मंदिराची तोडफोड
बरिसाल : बाकेरगंज उपजिल्हामधील श्यामपूर देउरी बारी सर्वोजनीन श्री श्री दुर्गा मंदिरात मूर्तींची तोडफोड
राजबारी : सज्जनकांडा जिल्हा मार्ग वाहतूक मालक ओक्य परिषद मंदिरावर हल्ला
पबना : सुजानगर येथील पालपारा दुर्गा मंदिरात बांधकाम सुरू असलेल्या मूर्तींची तोडफोड, जशोरेश्वरी माँ शक्तिपीठ मंदिरावर जिहाद्यांचा हल्ला
बागेरहाट : मोल्लरकुल पचिम पारा दुर्गा मंदिरात इल्सामिक कट्टरपंथींच्या एका गटाने आवारात घुसखोरी, त्यानंतर मूर्तींची तोडफोड आणि महिलांसह हिंदूंवर हल्ला
टांगैल : बसैल येथील एका बांधकामाधीन मंदिरातील मूर्तीची नासधूस
फरीदपूर : भांगा पोलीस स्थानक हद्दीतील दोन मंदिरांमध्ये निर्माणाधीन दुर्गा मूर्तींची तोडफोड