‘आयएनएस तुशील’ नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल

    08-Dec-2024
Total Views |
INS Tushil

नवी दिल्ली : भारतीय नौदल सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी रशियातील कॅलिनिनग्राड येथे ‘आयएनएस तुशील’ ( INS Tushil ) ही अत्याधुनिक बहुउद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. या समारंभाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रशिया आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, संरक्षण अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत. ‘आयएनएस तुशील’ ही प्रोजेक्ट ११३५.६ची क्रिवाक खखख श्रेणीची अपग्रेड केलेली युद्धनौका आहे. ‘आयएनएस तुशील’ युद्धनौकेसाठी जेएससी रोसोबोरॉन एक्स्पोर्ट, भारतीय नौदल आणि भारत सरकार यांच्यात ऑक्टोबर २०१६ मध्ये करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. मॉस्को येथील भारतीय दूतावासाच्या अधिपत्याखाली कॅलिनिनग्राड येथे तैनात असलेल्या युद्धनौका पर्यवेक्षण पथकातील तज्ञांच्या भारतीय पथकाने जहाजाच्या बांधकामाचे बारकाईने निरीक्षण केले. हे १२५ मीटर लांबीचे ३ हजार, ९०० टन वजनाचे जहाज रशियन आणि भारतीय अत्याधुनिक तंत्रज्ञान, युद्धनौका बांधणीतील सर्वोत्तम पद्धतींचे प्रभावी मिश्रण आहे.