"संविधानामुळेच बाळासाहेब थोरातांना पराभूत करु शकलो" संगमनेरच्या आमदाराचे वक्तव्य
06-Dec-2024
Total Views | 107
मुंबई : (Sangamner) "माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आमदार बनण्याची संधी मिळाली ते केवळ संविधानामुळेच, आज संविधानामुळेच आठ वेळा आमदार झालेले बाळासाहेब थोरात यांना पराभूत करु शकलो", असे वक्तव्य संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी केले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त खताळ हे चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. विरोधकांनी लोकसभेला संविधानाबाबत फेक नरेटिव्ह चालवले होते, मात्र जनतेने त्यांना या विधानसभेत उत्तर दिले असल्याचेही खताळ म्हणाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी गेली ४० वर्षे सलग आठवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी काँग्रेसच्या एकहाती वर्चस्वाला सुरुंग लावला. खताळ यांनी बाळासाहेब थोरातांचा १० हजार ५६० एवढ्या मतांनी पराभव केल्याने ते 'जायंट किलर' ठरले.