बाबासाहेबांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    06-Dec-2024
Total Views | 33
 
Shinde
 
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानात आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार आहे आणि त्यांनी दिलेले संविधान कायम आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  तो खरंच पुन्हा आलाय! आता झकासपैकी टिंगल, टवाळी करत पाच वर्षे घरी बसा
 
ते पुढे म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे, सत्ता हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. त्याचा उपयोग आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील मानवी हक्कांच्या प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. हे विचार कुठेही कमी पडणार नसून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे," असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121