मुंबई, दि.५: प्रतिनिधी "नवं सरकार हे धोरात्मक निर्णय घेणार आहे. नवं सरकार अधिक जोमानं आणि गतीनं काम करणार आहे. आमच्या कामाची दिशा बदणार नाही. दिलेली आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही तातडीनं पाऊलं उचलणार आहोत. मी राज्यातील १४ कोटी जनतेला विश्वास देतो की हे सरकार पूर्णपणे पारदर्शी कारभार करेल", असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला. शपथविधीनंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,"आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की, मागच्या वेळी जेव्हा एकनाथजी शिंदे आणि आम्ही आलो तेव्हा ती टेस्ट मॅच होती. नंतर अजितदादा जॉईन झाले आणि मॅच ट्वेन्टी ट्वेन्टी झाली. आता टस्ट मॅच आहे. त्यामुळे आता शांतपणे, धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायाभरणी करत आपल्याला राज्य पुढे न्यायचे आहे. आम्ही अनेक प्रकल्प सुरु केले आहेत, जे जे निर्णय आधी घेतले आहेत ते सुरूच राहणार आहेत. वचननामामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीने यापुढे पाऊले उचलायची आहेत. त्यादृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय घेत दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक लोकाभिमुख आणि राज्यातील जनतेला सोबत घेऊन जाणारे सरकार आपल्याला पुढच्याकाळातही पाहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
दरम्यान लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार आहे, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यात येतील. अर्थसंकल्पात याचा विचार केला जाईल. जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण होणार आहे. याबाबत काही तक्रार आहेत त्यामुळे निकषाबाहेर जाऊन जर कोणी काही घेतलं असेल तर आम्ही त्यांचा पुनर्विचार करू, असे देखील फडणवीस यांनी सांगितले.
ठबदल्यांचा नाही बदल दाखवेल असं राजकारण करायचे आहे. विरोधकांच्या संख्येनुसार त्यांचा आवाज ऐकलं जाणार नाहीतर त्यांनी योग्य विषय मांडले तर त्यांना योग्य सन्मान आम्ही देऊ. हे सरकार स्थिर असून पाच वर्षे आमचा कार्यकाळ पूर्ण होईल. येत्या सात, आठ आणि नऊ या तीन दिवसात शपथ घ्यावी. ९ तारखेला अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड करून राज्यपालांचे अभिभाषण करावं, अशी शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांना पाठविण्यात आली आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची करण्यात होईलठ,असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.