राज्यात पुन्हा देवेंद्र!

    04-Dec-2024
Total Views |
 
Fadanvis
 
मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, हे स्पष्ट झाले आहे. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांची एकमताने भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. गुरुवार, दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानावर ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
 
भाजपच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडीसाठी बुधवारी सकाळी विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजप आमदारांची बैठक पार पडली. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. भाजप नेत्या पंकजा मुंडे, प्रविण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे यांच्यासह वरीष्ठ नेत्यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.
 
त्याआधी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक विधिमंडळ पक्ष कार्यालयात झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या निरिक्षकांसह भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव गटनेतेपदासाठी अंतिम करण्यात आले.