आचार्य किशोर कुणाल यांना सरसंघचालकांनी वाहिली आदरांजली

    30-Dec-2024
Total Views |

Dr. Mohanji Bhagwat - Acharya Kishore Kunal
(RSS pays tribute to Acharya Kishore Kunal)

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
माजी आयपीएस अधिकारी तथा महावीर मंदिर ट्रस्ट, पाटणाचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांचे रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी निधन झाले. किशोर कुणाल यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दु:खद आणि हृदयद्रावक असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी म्हटले आहे.

हे वाचलंत का? : पूर्व आयपीएस अधिकारी आचार्य किशोर कुणाल यांचे निधन

किशोर कुणाल यांना आदरांजली वाहत सरसंघचालक म्हणाले, कुणालजी एक कार्यक्षम प्रशासक आणि सामाजिक-सांस्कृतिक आणि धार्मिक-आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज होते. ते भारतीय ज्ञान परंपरेचे अभ्यासक होते आणि अयोध्या श्री रामजन्मभूमी आंदोलन आणि मंदिराच्या बांधकामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि प्रियजनांसोबत आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना.