धाका : बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराचे नवे अध्याय दिवसेंदिवस रचले जात आहेत. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेशमध्ये अटक करण्यात आलेले आणि देशद्रोहाचा आरोप असलेले ईसकॉनचे पुजारी चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांच्या जामिनाची सुनावणी पुढीच्या महिन्यावर ढकल्याणात आली आहे. ३ डिसेंबर रोजी, म्हणजेच मंगळवारी झालेल्या सुनावणीसाठी कोर्टात कोणताही वकील हजर न राहिल्याने हा निर्णय घेतल्याची माध्यमांना मिळाली आहे.
चिन्मय कृष्ण दास यांच्या साठी न्यायालयीन लढा लढण्याच्या तयारीत असलेले रमेन रॉय यांच्यावर काही कट्टरपंथीयांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये रॉय हे गंभीर जखमी झाले. बांगलादेश मधील किमान ७० वकिलांवर खोटी कारवाई करण्यात आली आहे जेणेकरून ते चिन्मय कृष्ण दास यांची केस लढू शकणार नाही असा आरोप बांगलादेश संमिलिता सनातनी जागरण जोतेने केला आहे. चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी सध्या बांगलादेश संमिलित सनातनी जागरण जोतेचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत. अल्पसंख्याक गटांना मजबूत कायदेशीर संरक्षण मिळावे या मागणीसाठी रंगपूरमधील हिंदू समुदायाने केलेल्या निदर्शनेनंतर त्यांना गेल्या महिन्यात ढाका येथे अटक करण्यात आली होती. बांगलादेश मधील सरकारने दास यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला आहे.