यमुना स्वच्छतेच्या प्रश्नावरून केजरीवालांचा नवा कावेबाज डाव!

    29-Dec-2024
Total Views |

yamuna

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांनी नवीन डाव टाकायाला सुरूवात केली आहे. माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की लोकांनी मला मतदान केले नाही, तरी सुद्धा मी यमुना नदी स्वच्छ करणार आहे असे केजरीवाल म्हणाले. मी राजकारणात केवळ मतपेटीच्या राजकारणासाठी आलो नसून,आता कुठे मला राजकारण कळायाला लागले आहे. असे प्रतिपादन केजरीवाल यांनी केले आहे.

वास्तविक केजरीवाल यांना बहुदा या गोष्टीचा विसर पडला असावा की १० वर्षांपूर्वी सत्तेत येण्यासाठी त्यांनी यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी ते पाळले नाही. २०१९ साली केजरीवाल सरकारने यमुना नदी पुढच्या ५ ते ६ वर्षात स्वच्छ केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्याच डिसेंबर महिन्यात केजरीवाल यांनी वचन दिले की २०२५ पर्यंत ते सबंध गाव पवित्र आणि स्वच्छ अशा यमुना नदीत आंघोळ करू शकेल. परंतु केजरीवाल यांनी केलेल्या सर्व आश्वासानांवर अक्षरशा: पाणी फिरले आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने यमुनेच्या स्वच्छतेसाठी तब्बल ६, ८५६ कोटी रूपये खर्च केले होते. दुसऱ्या बाजूला २०२३ - २४च्या अर्थसंकल्पामध्ये दिल्ली सरकारने १,०२८ कोटी रूपयांची तरतूद यमुनेच्या स्वच्छतेसाठी केली गेली होती. यमुना नदी स्वच्छ झाली नाहीच, मग इतक्या सगळ्या पैशांचे काय झाले असा प्रश्न आता विचारला जातोय.