बांगलादेशी घुसखोर 'जहांगीर' दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!
29-Dec-2024
Total Views |
नवी दिल्ली : भारताचे नागरिकत्व न घेता, अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात दिल्ली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच आता रंगपूरी इथे राहणाऱ्या जहांगीर आणि त्याच्या कुटुंबातील ६ जणांना पोलिसांनी परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जहांगीरने त्याच्या बांगलादेशी असल्याची कबूली दिली आहे. मूळचा धाका इथला रहिवासी असलेला जहांगीर जंगलातून मार्ग काढत व ट्रेन मध्ये प्रवास करत भारतात आला होता.
दिल्लीमध्ये बस्तान बसवल्यावर, पुन्हा एकदा तो बांगलादेशात गेला व आपल्या बायकामुलांना घेऊन आला. एकूण ६ जणांचे हे बिऱ्हाड दिल्लीच्या रंगपूरी इथे राहत होता. दिल्ली पोलिसांच्या पडताळणी मोहिमाअंतर्गत सबंध भागाची तपासणी करत असताना, सदर कुटुंबवर दिल्ली पोलिसांचा संशय होता. तपासणी दरम्यान असे लक्ष्यात आले की त्यांनी आपली बांगलादेशी असल्याची सगळी कागदपत्रं नष्टं कली होती. जहांगीर याच्या कुटुंबावर पडताळणी आणि तपासाच्या निकालांच्या आधारे योग्य कायदेशीर कारवाई करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. या मोहिमेचा एक भाग म्हणून, दिल्ली पोलिसांनी दक्षिण पश्चिम जिल्ह्यात संयुक्त तपासणीची मालिका चालवली आहे. सदर मोहिमेच्या अंर्तगत आता पर्यंत ४०० कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे.