मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या गाडीचा भीषण अपघात!

चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोन मजुरांना चिरडले

    28-Dec-2024
Total Views |
Urmila Kothare

मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरात उर्मिला कोठारेच्या ( Urmila Kothare ) गाडीचा अपघात झाला. दि. २७ डिसेंबर रोजी रात्री पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. या अपघातात एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

उर्मिला कोठारे शूटींग संपवून घरी परतत असताना हा अपघात घडून आला. ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोन मजुरांना गाडीनं उडवलं. यामधील एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर, दुसरा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे.

अपघात झाल्यावर उर्मिला कोठारेच्या गाडीतील एअर बॅग्स वेळीच उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला. गाडीचालकाला व उर्मिलालादेखील दुखापत झाली आहे. यामध्ये गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले.