अण्णा विद्यापीठात झालेल्या अत्याचार प्रकरणी के. अन्नामलाईंचे ४८ दिवस उपोषण, स्वतःलाच देतात चाबकाचे फटके

    27-Dec-2024
Total Views |
 
K. Annamalai
 
चेन्नई : तमिळनाडू राज्याचे भाजपचे प्रमुख के. अन्नामलाई (K. Annamalai) यांनी अण्णा विद्यापीठात झालेल्या अत्याचाराप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याबाबत वेगळा मार्ग स्वीकारला आहे. २३ डिसेंबर २०२४ रोजी अण्णा विद्यापीठात लैंगिक अत्याचाराची घटना घडली. विद्यापीठाबाहेरील लोकांनी प्रेयसी आणि तिच्या प्रियकरावर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी आता के. अन्नामलाई यांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी ४८ दिवस उपोषण करणार असल्याची त्यांनी  घोषणा केली. तसेच ते ६ वेळा स्वतःलाच चाबकाचे फटके मारणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक सरकार पाडेपर्यंत बूट घालणार नाहीत, अशी त्यांनी घोषणा केली आहे.
 
अण्णा विद्यापीठात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यावेळी हल्लेखोर हे विद्यापीठातील नसल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी हल्लेखोरांनी प्रियसीसोबत गैरवर्तन केले. तिने परिधान केलेले कपडे उतरवण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला. त्यावेळी तिचे काही व्हिडिओही काढण्यात आले. याप्रकरणी पीडितेने कोट्टरपुरम पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
 
दरम्यान, मिळालेल्या अहवालानुसार, आरोपी हा ज्ञानसेकरन हा पुनरावृत्तीचा आरोपी आहे आणि द्रमुकाशी संबंधित आहे. उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि मंत्री एम. सुब्रमण्यम यांच्यासह द्रमुकच्या प्रमुख व्यक्तींसोबतचे फोटो सोशल व्हायरल होत आहेत.
 
 
 
२६ डिसेंबर रोजी के अन्नामलाई यांनी द्रमुक सरकारकडून न्याय मिळावा या मागणीसाठी निषेधाचा एक प्रकार म्हणून ते, ८४ दिवस उपोषण करणार आहेत. तसेच स्वतःला ६ वेळा चाबकाने मारत आणि तामिळनाडू द्रमुक सरकार पडेपर्यंत पायात बूट घालणार नाही, अशी घोषणा केली. ती घोषणा त्यांनी अंमलातही आणली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.