शिवमंदिरात असलेल्या मूर्तींची समाजकंटकांकडून विटंबना
मथुरा येथील शिवमंदिरात निंदनीय कृत्य
27-Dec-2024
Total Views |
मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथील स्थानिक मंदिरात काही तरूणांनी हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींची विटंबना केल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिवमंदिरात असलेल्या मूर्तीची तोडफोड करत त्या मूर्ती मंदिराबाहेर फेकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिरात काही देवी-देवतांचे फोटो ठेवण्यात आले होते त्यांचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी काही लोकांनी मनस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातून पोलिसांनी दोन्ही गटांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
प्रसारमाध्यमानुसार, बुधवारी २६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री मथुरा येथील नौझील पोलीस ठाणे हद्दीत उदियादढी गावामध्ये बांधलेल्या मंदिरात काही तरूण आले होते. त्यांनी मंदिरावरील कळस, त्रिशूळ तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच मंदिरात बसवण्यात आलेल्या देव-देवतांचे लावण्यात आलेले चित्र जाळण्याचे काम केले होते.
हे कृत्य आता गावातील काही लोकांनी पाहिले असता ते घटनास्थळी पोहोचले. यानंतर हे सर्व तरुण पळून गेले. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि घडलेला प्रकार समजून घेतला. यावेळी विटंबना करण्यात आलेल्या मूर्तींचे नूतणीकरण करण्यात आले. यावेळी घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.