"तीन मजलेच नाहीतर संपूर्ण संजौली मशीद अवैध", देवभूमी संघर्ष समितीचा दावा

    27-Dec-2024
Total Views | 102
 
Sanjauli Masjid illegle
 
शिमला : हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी शिमला येथील चर्चेत असलेली संजौली मशीद काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मशिदीचे तीन मजले अवैध असल्याचे सांगण्यात आले. मात्र आता केवळ तीन मजलेच नाहीतर संजौली येथील चर्चेत असलेली मशीद ही बेकायदेशीर असल्याचे बोलले गेले. मशिदीठिकाणी असलेली संबंधित जमीन वक्फ बोर्डाची नसून सरकारची आहे. मशिदीच्या बांधकामाविरोधात सुरू असलेल्या लढ्यात देवभूमी संघर्ष समितीने हा दावा केला असल्याचे सांगितले आहे.
 
आतापर्यंत जमिनीच्या नोंदी केवळ सरकारच्या नावावर असून आता त्यात छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे समितीचे म्हणणे आहे. याआधीही महापालिका आयुक्त न्यायालयाने वक्फ बोर्डाला जमिनीच्या कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र त्यावेळी जमिनीच्या मालकीची कागदपत्रे दाखवण्यास वक्फ बोर्डाने वेळ मागितला.
 
दरम्यान संजौली येथील वरचे तीन मजले पाडण्यात येणार असल्याचे आदेश याआधी देण्यात आले आहेत. त्यांना तोडण्याचे काम सध्या सुरू आहे. अशातच आता न्यायालयाच्या उर्वरित दोन मजल्याबाबतची सुनावणी सध्या न्यायालयात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121