'या पुढे अमेरीकेत दोनच जेंडर!' ट्रम्प यांचा मोठा निर्णय
26-Dec-2024
Total Views |
वॉशिंग्टन डीसी : अमेरीकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी ट्रान्सजेंडर क्रेझ संपवणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. त्याच बरोबर स्त्री आणि पुरूष हे दोनच जेंडर असतील अशा अर्थाचे अधिकृत धोरण आम्ही आणू अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.ऍरिझोना मध्ये टर्निंग पोइंट या कार्यक्रमात ते बोलत होते.
अमेरीकेतल्या राजकारणात ट्रान्सजेंडर आणि त्यांचे हक्क हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. डेमोक्राटीक आणि रिपब्लीकन पक्षाने परस्परविरोधी धोरणं आखली आहेत. याच पार्श्वभूमीवर डोन्लाड ट्रम्प यांचे वक्तव्यं त्यांची धोरणात्मक दिशा दर्शवणारं आहे. आपल्या भाषणात बोलताना ट्रम्प म्हणाले की सध्या सुरू असलेली ट्रान्सजेंडर क्रेझ ते संपुष्टात आणणार आहेत. तसेच त्यांना अमेरीकेच्या लष्करातून सुद्धा बडतर्फ केले जाईल. जर हा निर्णय घेण्यात आला, तर १५,००० लोकांना आपली लष्करी सेवा सोडावी लागणार आहे. सामान्य मुलं मुली ज्या शाळेत शिकतात, तिथून सुद्धा त्यांना काढून टाकण्यात येईल त्याच बरोबर स्त्री आणि पुरूष यांच्या खेळांचे वेगळं वर्गीकरण केले जाईल. पुरूषांना स्त्रीयांचे खेळ खेळता येणार नाही असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. आपल्या भाषणात ते म्हणाले की " येत्या २० जानेवारीला गेल्या ४ वर्षांपासून सुरू असलेली राष्ट्रीय अधोगती, अपयश हे सारं लयाला जाईल आणि शांतता, समृद्धी याचे नवे युग जन्माला येईल."