ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याजवळ असलेल्या अवैध बांधकामावर प्रशासनाचा बुलडोझर पॅटर्न

    26-Dec-2024
Total Views |

Khwaja Garib Nawaz Dargah
 
जयपूर : राजस्थान प्रशासनाने अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याजवळ असलेल्या अवैध जागेत असलेले बांधकाम बिलडोझरने तोडले. यावेळी असलेल्या संबंधित दुकानावर आणि इतर लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. अतिक्रमण हटवताना दुकानदारांनी प्रशासनाशी वाद घालण्यास सुरूवात केली. याप्रकरणाबाबतची कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासन सांगितले. ही घटना गुरुवारी २६ डिसेंबर २०२४ रोजी घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
 
अजमेर दर्ग्याच्या दिल्ली गेट आणि अधाई दिन झोपरासह उर्वरित भागांत अजमेक प्रशासनाच्या सहकार्याने महापालिकेने ही कारवाई केली आहे. महापालिकेने गल्लोगल्ली लावण्यात आलेल्या दुकांनांची अतिक्रमणे हटवण्यात आली. लाखोंच्या संख्येने उरूसासाठी लोक येणार याआधी ही कारवाई करण्यात आली.
 
दरम्यान दुकानदारांना याआधीही नोटीशी बजावण्यात आल्या होत्या. दर्ग्याच्या सर्वेक्षणासाठी मागणी करणारी याचिका स्थानिक न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबतची सुनावणी सध्या स्थगित करण्यात आल्याचे वृत्त आहे.