'आप'च्या रविंदर सोलंकी यांचा केजरीवालांना घरचा आहेर!
26-Dec-2024
Total Views |
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाताना, आम आदमी पक्षाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. रेवडी वाटप करणाऱ्याच्या विचारात असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना आता त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी घरचा आहेर द्यायला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री महिला सम्मान योजना नामक नवी योजना केजरीवाल घेऊन येत आहेत, पण हे करण्याआधी केजरीवाल हे महिन्याकाठी एक हजार रूपये महिलांच्या खात्यात जमा करणार होते, ज्यात त्यांना अपयश आले आहे असे मत, आम आदमी पक्षाचे रविंदर सोलंकी यांनी व्यक्त केले.
गेल्या निवडणुकीत वचन दिल्याप्रमाणे रक्कम न जमा केल्याने सोलंकी यांनी स्वत:च्याच पक्षावर टीका केली आहे. सोलंकी यांच्या मते पक्षाने पूर्वीच्या निवडणुकीत दिलेल्या वचनांचे पालन करायाला हवे होते. वचन न पाळणाऱ्या पक्षावर जनता विश्वास ठेवत नाही, असे मत, सोलंकी यांनी व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना सोलंकी म्हणाले की " अनेक महिला ऑफीसात येऊन १००० रूपयाची मागणी करतात, आता पर्यंत केजरीवाल हजार रूपये देऊ शकले नाही, आणि आता २१०० रूपयांसाठी ते महिलांना रांगेत उभे राहायला सांगत आहेत. दिल्लीच्या महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना' सोबत 'संजीवनी योजना' नामक कुठलीही योजना अस्तित्वात नाही असे स्पष्टीकरण दिले, यानंतरच रविंदर सोलंकी यांनी आपल्या पक्षावर टीका केली आहे.