जमात-ए-इस्लामी समर्थकांनी स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या सैनिकाच्या गळ्यात घातला चप्पलांचा हार

बांगलादेशातील मुक्तीसंग्रामात लढणाऱ्या स्वातंत्र्यसेनानीचा अवमान

    26-Dec-2024
Total Views |

 Bangladesh
 
ढाका : बांगलादेशातील (Bangladesh) अब्दुल है कानू या स्वातंत्र्यसेनानीची जमात-ए-इस्लामी दहशतवादी संघटनेच्या समर्थकांनी अवमान केल्याची घटना घडली. कट्टरवाद्यांनी संघटनेच्या समर्थकांनी त्यांच्या गळ्यात चप्पलांचा हार घालत त्यांचा अपमान केला. त्यानंतर त्यांना धमकीही देण्यात आली. ही घटना कोमिल्ला जिल्ह्यातील चौधरग्राम येथे घडली. ज्याठिकाणी बीर प्रतीक पुरस्कार विजेते अब्दुल है कानू त्यांच्या लुडियारा गावात परतल्यानंतर त्यांना लक्ष्य करण्यात आले.
 
या अपमानास्पद कृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात १०-१२ जण कानूला घेरत आहेत. त्याला माफीही मागण्यास सांगितली जात आहे. यातील काही लोक त्याला गाव सोडण्यास सांगत असल्याची धमकी देत आहेत.
 
 
 
कानू यांना धमकावणाऱ्यांपैकी एक दहशतवादी होता. जो २००६ साली दुबई येथे फरार झाला होता. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतर तो पुन्हा बांगलादेशात परतला आहे. जमात-ए-इस्लामी दहशतवादी संघटनेचा राजकारणाशी संबंधित असलेल्या अबुल हाशम मजुमदार आणि वाहिद मजुमदार यांनी हल्ल्याचे नेतृत्व केल्याचा आरोप कानू यांनी केला आहे. जमात-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनेने १९७१ च्या बांगलादेशी मुक्ती संग्रामात पाकिस्तानला पाठिंबा दिला होता.
 
दरम्यान, बांगलादेशातील न्यूज पोर्टलने कानूच्या सूत्राने म्हटले की, मला वाटले की यावेळी मी गावात बिंधास्त राहू शकेन. पण त्यांनी माझ्यासोबत एखाद्या जनावरांप्रमाणे वर्तन केले.