लाडकी बहिण योजना! आधार लिंकमुळे पैसे रखडलेल्या महिलांना पैसे मिळणार

    25-Dec-2024
Total Views |
 
Ladki Bahin
 
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, आधार कार्ड लिंक नसल्याने पैसे रखडलेल्या महिलांनासुद्धा आता पैसे मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
 
हे वाचलंत का? -  गडचिरोलीचे पालकमंत्रीपद फडणवीसांकडेच राहणार? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत
 
विधानसभा निवडणूकीनंतर योजनेचे पैसे कधी येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. दरम्यान, मंगळवार, २४ डिसेंबरपासून लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. "विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आधार सिडींग राहिलेल्या सुमारे १२ लाख ८७ हजार ५०३ भगिनींना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७ लाख ९२ हजार २९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.