ऑरीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण! भन्साळींच्या चित्रपटात झळकणार; दीपिका पादुकोणही असणार?
24-Dec-2024
Total Views |
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार किड्स आणि अंबानींच्या प्रत्येक समारंभात एक चेहरा फार झळकला तो म्हणजे ऑरी याचा. ओरहान अवत्रामणी अर्थात ऑरी नेमकं काय करतो याबद्दल कुणी काही ठोस माहिती देऊ शकत नाही. पण आता त्याच्याबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. लवकरच ऑरी चित्रपटात दिसणार असून थेट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात त्याला संधी मिळाली आहे.
ऑरी संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार असून. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल प्रमुख भूमिकेत आहेत.
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या बातमीनुसार, ऑरीला ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात कॅमिओसाठी विचारणा करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे दीपिका पादुकोणही या चित्रपटात स्पेशल अपिअरन्समध्ये दिसू शकते, असेही म्हटले जात आहे. ऑरीबद्दल सांगायचे झाल्यास गेल्यावर्षी ‘बिग बॉस १७’ मध्ये तो पाहुणा सदस्य म्हणून सहभागी झाला होता.