नाना पाटेकरांच्या 'वनवास'ला प्रेक्षकच मिळेना! वीकेंडलाही कमाईत कमालीची घट

    23-Dec-2024
Total Views |
 
vanvaas
 
 
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असणारा वनवास हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या. खरं तर बऱ्याच काळानंतर नाना पाटेकरांचा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतील असं वाटलं होतं पण जरा उलटंच झालं. प्रेक्षकांनी वनवास चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केलेली आकडेवारी समोर आली असून जितकं चित्रपटाचं बजेट होतं तितकी देखील कमाई हा चित्रपट अद्याप करु शकला नाही आहे.
 
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, वनवास चित्रपटाने पहिल्या दिवशी ६० लाखांची कमाई केली होती. चित्रपटाने एकूण तीन दिवसांमध्ये केवळ ३ कोटींची कमाई केली आहे. तसेच, वनवास चित्रपटाचे बजेट ३० कोटी असून कमाईचे आकडे पाहता अजूनतरी नाना पाटेकरांच्या या चित्रपटाने बजेटचा आकडा ओलांडला नाही आहे.
 
 
 
'वनवास' चित्रपटात नाना पाटेकरांसोबत उत्कर्ष शर्माची देखील प्रमुख भूमिका आहे. 'गदर' आणि 'गदर २' या चित्रपटांचे दिग्दर्शक अनिल शर्मांनी 'वनवास'चं दिग्दर्शन केलं आहे. वडील- मुलाच्या भावुक नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट 'वनवास' चित्रपटात पाहायला मिळते.