मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर भुजबळ दिल्लीला रवाना होणार?

    23-Dec-2024
Total Views | 66
 
CHHAGAN BHUJBAL
 
मुंबई : (Chhagan Bhujbal) मंत्रीमंडळातून डावलल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांनी सोमवारी दि. २३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर छगन भुजबळ दिल्लीला रवाना होणार आहेत.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या या भेटीविषयी विविध अंदाज लावले जात आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चाही सुरु आहे. परंतु यावर भुजबळांनी येत्या १० दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होणार, असा संकेत दिला आहे.
 
दिल्लीत भुजबळ कुणाची भेट घेणार?
 
दरम्यान, छगन भुजबळ दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. दिल्ली दौऱ्यात ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. तसेच भुजबळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत, अशी बोललं जात आहे. मात्र भुजबळ नेमकी कुणाची भेट घेणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले. भुजबळांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना मोठे पद मिळू शकते, असेही म्हटले जात आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121