कट्टरपंथी वाजिदने मंदिरालाच बनवले घर, मंदिरावर फडकवला हिरवा इस्लामी ध्वज

हिंदू संघटनांतील कार्यकर्त्यांनी शिकवला धडा

    23-Dec-2024
Total Views |

उत्तर प्रदेश
 
बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली येथे कट्टरपंथींच्या ताब्यात असलेले एक घर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे मंदिर १५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. ५० वर्षांपूर्वी वाजिद अली नावाचा एक कट्टरपंथी याठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याने संपूर्ण मंदिर ताब्यात घेत त्याला घर बनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या मंदिरावर इस्लामी ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आता प्रशासनाने चौकशी करून मंदिर रिकामे करण्यासाठी नोटीस बजावली आहे. मंदिरावर हिरवा झेंडा लावण्यात आला होता तोही झेंडा काढण्यात आला असल्याचे वृत्त आता समोर आले आहे.
 
प्रसारमाध्यमानुसार, प्रकरण बरेलीच्या किला पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील कटघर परिसरात राहणारे राकेश सिंह यांनी दावा केला आहे की, सुमारे दीडशे वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांनी महाराणी गंगेचे मंदिर बांधले होते. यानंतर या मंदिरात अनेक देव- देवतांच्या मूर्ती विधीनुसार बसवण्यात आल्या होत्या. यामुळे संबंधित मंदिर हे हिंदूंसाठी पवित्र स्थान म्हणून नावारूपाला आले होते.
 
 
 
नंतर याठिकाणी नियमितपणे पूजा होऊ लागली. दरम्यान संबंधित मंदिर हे सुमारे ५० वर्षांआधी या मंदिरात बांधण्यात आलेली खोली सहकारी संस्थेला भाड्याने देण्यात आली होती. को-ऑप- सोसायटीच्या खोलीचा आणि नंतर संपूर्ण मंदिराचा ताबा घेतल्याचा आरोप आहे. त्यांनी विधीप्रमाणे स्थापित केलेल्या मूर्ती हळूहळू गायब केल्या आणि पूजाही बंद करण्यात आली.
 
यावेळी काही हिंदूंनी मंदिरात प्रवेश केला होता. तेव्हा त्याठिकाणी कट्टरपंथी वाजिद अलीचा मुलगा त्याठिकाणी होता. तेव्हा हिंदूंनी घरावरील इस्लामी ध्वज काढत तेथे भगवा ध्वज लावत जय श्रीराम अशा घोषणा दिल्या आहेत. यावेळी घटनास्थळी फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गुरूवारी राकेश सिंह आणि वाजिद अली यांच्या मुलांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.