१२० मंदिरांना टाळे, हिंदू धर्मस्थळांभोवती विक्री केली जाते बिर्याणी

    23-Dec-2024
Total Views |

 Hindu
 
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एकूण १५० मंदिरांना कुलूप लावले गेले आहे. तर धर्मस्थळांभोवती बिर्याणीची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. तर काही ठिकाणी जमाव जमून नमाज अदा केली जात असल्याचे चित्र आता समोर आले आहे. यामुळे आता मंदिराची दुर्दशा निर्माण झाली आहे. याप्रकरणी आता कानपूर येथील महापौरांनी संबंधित हिंदू मंदिरांची पाहणी केली असल्याचे वृत्त आहे. एकूण १०० हून अधिक हिंदू मंदिरांवर अतिक्रमण केल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित मंदिरे ही मुस्लिमबहुल भागात असल्याची माहिती समोर येत आहे.
 
प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, बेकनगंजच्या राम जानकी मंदिरा मागे राहणारा नफीस म्हणतो, तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा आपण मंदिर खुले करू शकता. याच्याशी आमचा काहीही एक संबंध नाही. मंदिर वेगळे आणि घर वेगळे आहे. हा संपूर्ण परिसर हा सराफ खाणा होता. याठिकाणी सर्व हिंदू बांधव होते.
 
दरम्यान, एका माध्यमाच्या अहवालानुसार, २१ डिसेंबर २०२४ रोजी कानपूर महपौर प्रमिला पांडे ७ पोलीस ठाण्यांच्या पोलीस दलासह मुस्लिमबहुल भागात बेकनंजमध्ये पोहोचल्या होत्या. याच भागात २०२२ मध्ये एका भाजपच्या नेत्याच्या विरोधात मुस्लिमांनी निषेध नोंदवत पोलिसांवर हल्ला केला होता.
 
असातच आता याच भागात प्रमिला पांडे यांनी एकूण ५ मंदिरे शोधून काढत बेकायदेशीर धंदे आणि सध्याची परिस्थिती जाणून घेतली आहे. यामध्ये कानपूर येथील राम जानकी मंदिर पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरे राधाकृष्णाचे मंदिर आहे. हे मंदिर अतिशय जीर्ण अवस्थेत सापडले. या परिसरात महादेव शिवाचे तिसरे मंदिर सापडले. मंदिरामागे निवासी वस्त्या आहेत.
 
या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केल्यानंतर त्याठिकाणी पूर्वीप्रमाणेच पुजा करण्यात येणार असल्याचे आता महापौरांनी सांगितले आहे. महापौर प्रमिला पांडे यांनीही मंदिरात बसवलेल्या मूर्ती कुठे आहेत, याप्रकरणाचा तपास सुरू आहे. कानपूर महापालिकेच्या सर्वेक्षणात शहरातील मुस्लिम भागात जवळपास म१२० मंदिरे बंद असल्याचे माहिती समोर आली आहे.